Wedding Gifts

What to gift on second Wedding anniversary ?

लग्नाचं दुसरं वर्ष  !! अरेच्चा पाहिलं वर्ष आत्ता तर संपलं होतं . बापरे तेव्हाच तर मी गिफ्ट देण्यासाठी किती धडपड केली होती .आता आला का तोच प्रश्न परत ? असा खेद कितीही केला तरी तिच धडपड करण्यासाठी आपला जीव आतुरलेले हा असतोच . तर मग आपण ह्या वेळी बघू की लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला कोणतं बरं गिफ्ट जोडलं गेलं आहे.

     कागदाचं महत्व आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच आहे ,ज्यांचं miss  झालं ते https://giftbuds.wordpress.com/2017/01/03/what-to-gift-on-first-wedding-anniversary/ या लिंक वर जाऊन वाचू शकतात . तर या वर्षी भेट म्हणून आपण कापसापासून बनवलेल्या वस्तु देऊ शकतो कारण …..

कापुस (Cotton )

कापुस म्हंटला की त्याचा मऊपणा आपल्याला लगेच आठवतो . पण फक्त मऊपणा कापसाचा गुणधर्म नाही तर त्याचे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या नात्यांमध्ये ही तेवढेच आवश्यक आहेत.तर सुरवात त्याच्या मुलायम या गुणधर्मापासूनच करूयात

मुलायम (Soft)  –

कापसाप्रमाणेच २ वर्षात आपलं नातं नाजुक नसलं तरी मुलायम आणि गुलाबी हे नक्कीच असतं.तर कापसापासून बनवलेल्या म्हणजेच cotton ची सुंदर भेट देऊन आपण असे प्रतीत करू शकतो की मी आपलं हे नाजूक नातं असाच अलगदपणे सांभाळेल . जसं तुझ्या ईच्छा तुझे नातेवाई आणि अगदी तुझा हट्ट सुद्धा !

द्रवशोषक (Good observant ) –

ज्या प्रमाणे कापूस हा पाण्याला शोषुन घेतो तसंच मी तुझ्या सोबत घालवलेले क्षण साठवून घेतोय कारण त्यामुळेच मला तुझा स्वभाव तुझ्या आवडी समजणार आहेत आणि मी तुझ्यासोबत एकरूप होऊ शकणार आहे.तरच आपलं हे नाते टिकून राहू शकणार आहे.

रंग आपलासा करणे (Color Retention) –

कोणत्याही रंगात टाका कापूस तो रंग आत्मसात करतो.  तसेच मी सुद्धा तुझ्या प्रत्येक रंगला जवळ करणार आहे अगदी तुझ्या रागाचा काळा रंग सुद्धा आणि प्रेमाचा गुलाबी रंग सुद्धा कारण त्यातूनच आपल्या संबंधाची सुंदर रंगेबीरंगी वीण त्यातून तयार होणार आहे.जी आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा सुंदर आणि पूर्ण वाटेल .

सामर्थ्य (strength ) –

कापूस दिसायला जरी नाजूक आणि मुलायम असला तरी जेव्हा त्याची वीण तयार होते तेव्हा तो मोठ्यातला मोठा ताण सहन करू शकतो तसेच आपले नाते असावे जे आयुष्यातल्या मोठ्यात ल्या मोठ्या संकटातून एकमेकांच्या साथीमुळे तारून नेवू शकू . तर मी असे वाचन देतो / देते कि कापसासारखंच सामर्थ्य मी दाखवेल आणि त्यासाठी मी काहीही करायला तय्यार आहे .
तर असा हा कापूस आणि त्यातून आपल्याला मिळणार हा सुंदर संदेश . तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळी
till that time be in contact –
 mail on  giftbuds@outlook.com
And for gift options visit www.giftbuds.in
like us on www.facebook.com/GiftBuds

2 thoughts on “What to gift on second Wedding anniversary ?

  1. Hello, just wanted to say, I liked this article. It was funny.
    Keep on posting!

  2. Hi there, this weekend is pleasant in support of me, as this occasion i am reading this enormous educational paragraph here at my home.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *