WHAT TO GIFT ON FIRST WEDDING ANNIVERSARY ?
Read More
Wedding Gifts

WHAT TO GIFT ON FIRST WEDDING ANNIVERSARY ?

निरनिराळ्या भावनांनी युक्त असं लग्नाचं पाहिलं वर्ष कसं संपत ! हे कळायच्या आत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस पुढयात येऊन ठेपतो. आणि अचानक आलेल्या या सुखद संकटाला आता कसे तोंड द्यावे हा यक्ष प्रश्नच निर्माण होतो. बापरे ! अजून मला ह्यांचा / हिचा स्वभावच नीटसा कळलेला नसतांना आता नेमकं भेट म्हणून काय द्यावं याचा विचार करणं म्हणजे भलतीच पंचाईत ! पण पाश्चत्य संस्कृतीतून जसे आपण अनेक सवयी सहज आत्मसात करतो , तसेच त्यांच्याकडे प्रचलीत असलेल्या काही सुंदर प्रथांचे सुद्धा आपण नक्कीच अनुसरण करू शकतो. कारण नीट विचार केला असता त्या आपल्या संस्कृतीच्या अगदी जवळपास अश्या असतात जश्या हातात हात घालून बागडणाऱ्या बहिणीचं जणू .

तर मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल आता भेट आणि संस्कृती या दोघांचा काय बरं संबंध ? तर तो असा, कि लग्नाच्या प्रत्येक वर्षी आपल्या सहचाऱ्याला म्हणजेच आपल्या भाषेतील Life Partner ला कोणत्या वस्तूंपासून बनवलेली भेट द्यावी ? आणि का ? हे पाश्चात्य संस्कृतीत सांगण्यात आलेलं आहे .तर तेच आपण एक एक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू . तर पहिल्या वर्षाची भेट आहे-

कागद (PAPER)
कागद ही अगदी साधी गोष्ट असली तरी त्यामागे जी भावना आहे ती अगदीच सुंदर प्रकारे आपल्या नाजुक नात्याशी निगडित आहे .कारण… काहींनी धिटाईने योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवलेलं तर काहींचं त्या जुन्या वहीत जपून ठेवलेलं पाहिलं प्रेमपत्र ! सर्वांच्या आयुष्यातल्या सुंदर टप्प्याचे साक्षीदार आहे. तसेचं पहिल्या लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा या कागदाला तेवढंच महत्व आहे. ते कस ?तर कागदाचे गुणधर्म आणि आपल्या नात्याचे गुणधर्म यांची सांगड आपण घालून बघूया –

नाजुक –

गुणधर्माने नाजुक असलेला कागद हा आपल्या नाजुक नात्याचं प्रतीक आहे,कारण या एक वर्षात आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही सवयी माहित झाल्या असल्या , तरी पुर्णपणे ओळख नक्कीच झालेली नसते.म्हणूनच नातं हे सुद्धा कागदा प्रमाणे जपून हाताळावे लागते. आणि याच नात्यांचे विविध पैलू जेव्हा कळू लागतात तेव्हा त्या कागदाचेच अप्रतीम पुस्तक तयार होते , ज्याला आपण आयुष्य म्हणतो .

सहजसुलभ –

लग्नाआधी फक्त स्वतःच्या खर्चाची सवय असताना अचानक कोणाची जबाबदारी येते . त्यातूनच मिळकत आणि खर्च यांची सांगड कशी घालावी हे पहिल्या वर्षी माणूस हळूहळू शिकत जातो . म्हणूनच सहज आणि स्वस्तात उपलब्ध असलेला कागद हा याच जुळवाजुळवीचे प्रतीक आहे.

जरी मी साधा असलो तरी माझी किंमत ही नक्कीच जगातल्या महागातल्या महाग वस्तुंपेक्षा कमी नाही .कारण कधी कधी सर्व काही मिळून सुद्धा २ ओळींमध्ये लिहिलेल्या स्तुतीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. व सुंदर गोष्टींसाठी नेहमी जादा किंमत मोजावीच लागते असेही नाही .

सोबत भविष्य लिहिणे (Writing future together ) –

ज्याप्रकारे वहीत लिहून, टिपणे काढून आपण अभ्यास करत असतो त्याच प्रकारे आपल्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर आपण सोबत अनुभवाचे धडे गिरवत ही वाटचाल यशस्वीरीत्या पार करू असेच कागद प्रतीत करतो. म्हणूनच आपल्या पार्टनर ला डायरी देऊन आपण आपले ” Future plans ” नजरे समोर ठेवू शकतो.

हलका ( Light weight ) –

ज्याप्रमाणे कागदाला आपण सहज उचलू शकतो तसेच आपण आपल्या या नात्याचे ओझे न समजता अगदी अलगद हाताळू हेच कागद सांगत असतो.तेव्हा कागदा प्रमाणेच नात्याला पण आपण सोबत अगदी पिसाप्रमाणे पेलून नेऊ असे आपण एकमेकांना वचन देऊ शकतो .

तर पुढच्या वेळी बघूया दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाची भेट . तोपर्यंत तुमच्या भावना किंवा प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत या खालील ठिकाणी पोहोचवू शकतात .

ई-मेल – giftbuds@outlook.com

Visit for Gift Options – http://www.facebook.com/GiftBuds

Gifts

Wedding Gifts

What to gift on second Wedding anniversary ?

लग्नाचं दुसरं वर्ष  !! अरेच्चा पाहिलं वर्ष आत्ता तर संपलं होतं . बापरे तेव्हाच तर मी गिफ्ट देण्यासाठी किती धडपड केली होती .आता आला का तोच प्रश्न परत ? असा खेद कितीही केला तरी तिच धडपड करण्यासाठी आपला जीव आतुरलेले हा असतोच . तर मग आपण ह्या वेळी बघू की लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला कोणतं बरं गिफ्ट जोडलं गेलं आहे.

     कागदाचं महत्व आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच आहे ,ज्यांचं miss  झालं ते https://giftbuds.wordpress.com/2017/01/03/what-to-gift-on-first-wedding-anniversary/ या लिंक वर जाऊन वाचू शकतात . तर या वर्षी भेट म्हणून आपण कापसापासून बनवलेल्या वस्तु देऊ शकतो कारण …..

कापुस (Cotton )

कापुस म्हंटला की त्याचा मऊपणा आपल्याला लगेच आठवतो . पण फक्त मऊपणा कापसाचा गुणधर्म नाही तर त्याचे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या नात्यांमध्ये ही तेवढेच आवश्यक आहेत.तर सुरवात त्याच्या मुलायम या गुणधर्मापासूनच करूयात

मुलायम (Soft)  –

कापसाप्रमाणेच २ वर्षात आपलं नातं नाजुक नसलं तरी मुलायम आणि गुलाबी हे नक्कीच असतं.तर कापसापासून बनवलेल्या म्हणजेच cotton ची सुंदर भेट देऊन आपण असे प्रतीत करू शकतो की मी आपलं हे नाजूक नातं असाच अलगदपणे सांभाळेल . जसं तुझ्या ईच्छा तुझे नातेवाई आणि अगदी तुझा हट्ट सुद्धा !

द्रवशोषक (Good observant ) –

ज्या प्रमाणे कापूस हा पाण्याला शोषुन घेतो तसंच मी तुझ्या सोबत घालवलेले क्षण साठवून घेतोय कारण त्यामुळेच मला तुझा स्वभाव तुझ्या आवडी समजणार आहेत आणि मी तुझ्यासोबत एकरूप होऊ शकणार आहे.तरच आपलं हे नाते टिकून राहू शकणार आहे.

रंग आपलासा करणे (Color Retention) –

कोणत्याही रंगात टाका कापूस तो रंग आत्मसात करतो.  तसेच मी सुद्धा तुझ्या प्रत्येक रंगला जवळ करणार आहे अगदी तुझ्या रागाचा काळा रंग सुद्धा आणि प्रेमाचा गुलाबी रंग सुद्धा कारण त्यातूनच आपल्या संबंधाची सुंदर रंगेबीरंगी वीण त्यातून तयार होणार आहे.जी आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा सुंदर आणि पूर्ण वाटेल .

सामर्थ्य (strength ) –

कापूस दिसायला जरी नाजूक आणि मुलायम असला तरी जेव्हा त्याची वीण तयार होते तेव्हा तो मोठ्यातला मोठा ताण सहन करू शकतो तसेच आपले नाते असावे जे आयुष्यातल्या मोठ्यात ल्या मोठ्या संकटातून एकमेकांच्या साथीमुळे तारून नेवू शकू . तर मी असे वाचन देतो / देते कि कापसासारखंच सामर्थ्य मी दाखवेल आणि त्यासाठी मी काहीही करायला तय्यार आहे .
तर असा हा कापूस आणि त्यातून आपल्याला मिळणार हा सुंदर संदेश . तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळी
till that time be in contact –
 mail on  giftbuds@outlook.com
And for gift options visit www.giftbuds.in
like us on www.facebook.com/GiftBuds